Skip to main content

Posts

Showing posts from January, 2022

Why sprinkle cow urine in the house? घरात गोमूत्र का शिंपडावे?

 आपल्या हिंदू संस्कृतित गोमुत्राला महत्वाचे स्थान आहे. शुभ कार्यात अशुभ  काही घडू नये म्हणून गोमूत्र शिंपडले जाते. त्यामुळे पुजा, लग्न किंवा अन्य कोणताही समारंभ असो त्यावेळी गोमुत्र शिंपडले जाते. तर तुमच्या कुंडलीतील ग्रहात दोष असल्यास किंवा वास्तू दोष असल्यास तुम्ही दर सोमवारी आणि शुक्रवारी थोडेसे गोमूत्र पूर्ण घरात शिंपडल्याने त्रास कमी होतो, अशी धारणा आहे. सगळ्या परंपरांच्या मागे मनोवेज्ञानिक किंवा वैज्ञानिक कारणे आहेत आणि त्यांचा संबंध धर्माशीही आहे. घर-परिवारातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ऋषीमुनींनी गोमूत्र  शिंपडण्याचा अचूक उपाय सांगितला आहे.  जुन्या काळापासून गोमुत्र शिंपडण्याची परंपरा चालत आली आहे. शास्त्रात गाईला पूजनीय आणि पवित्र मानले आहे. गाईला माता असे संबांधले आहे. त्यामुळे गाईपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट पवित्र आहे. हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले गेले आहे. वास्तुनुसार गायीचे गोमूत्र घरातील सग़ळे वास्तुदोष समाप्त करण्यास उपयुक्त ठरते. गायीची पुजा केल्याने आपले पाप नष्ट होते, अशी धारणा आहे. काही बाबतीत जर तुम्हाला त्रास होत असेल, घरातील सदस्यांमुळे मानसिक ताण आणि क्लेश

In Ayurveda, Maharshi Vagbhatt's formula for healthy living | आयुर्वेदामध्ये महर्षी वाग्भट्ट यांनी सांगितलेली निरोगी राहण्याची सूत्रे

१) भोजन बनवल्यानंतर 48 मिनिटांच्या आत त्याचे सेवन करणे गरजेचे आहे २) पंधरा दिवसांपेक्षा जास्त जुने पीठ वापरू नये ३) साठ वर्षांपर्यंत शरीरश्रम कमी करू नये साठ वर्षानंतर शरीर श्रम कमी करू शकता 18 वर्षांपर्यंतच्या मुलांचे खेळणे हेच त्यांचे शरीर श्रम आहे ४) जिथे आपण राहतो तेथील भौगोलिक परिस्थितीचे ध्यान ठेवूनच आपली दिनचर्या व खान-पान असावे ५) ज्या भौगोलिक परिस्थिती मध्ये आपण राहतो तिथे राहत असताना जे परिवर्तन होईल ते आपल्यासाठी अनुकूल आहे व ज्या भौगोलिक परिस्थिती मध्ये आपण राहत नाही त्या ठिकाणी झालेले परिवर्तन आपणास प्रतिकूल आहे ६) शारीरिक दुःख कमी करण्यात पोटाचा वाटा सर्वात मोठा आहे ९० % आजार हे पोटातूनच निर्माण होतात ७) आजारांपासून आपला बचाव करणे हे आजारावरती इलाज करण्यापेक्षा सर्वोत्तम आहे ८) भोजन करणं महत्त्वाचं नाही तर खाल्लेले भोजन पचवणे खूप महत्वाच आहे