Skip to main content

In Ayurveda, Maharshi Vagbhatt's formula for healthy living | आयुर्वेदामध्ये महर्षी वाग्भट्ट यांनी सांगितलेली निरोगी राहण्याची सूत्रे



१) भोजन बनवल्यानंतर 48 मिनिटांच्या आत त्याचे सेवन करणे गरजेचे आहे

२) पंधरा दिवसांपेक्षा जास्त जुने पीठ वापरू नये

३) साठ वर्षांपर्यंत शरीरश्रम कमी करू नये साठ वर्षानंतर शरीर श्रम कमी करू शकता 18 वर्षांपर्यंतच्या मुलांचे खेळणे हेच त्यांचे शरीर श्रम आहे

४) जिथे आपण राहतो तेथील भौगोलिक परिस्थितीचे ध्यान ठेवूनच आपली दिनचर्या व खान-पान असावे

५) ज्या भौगोलिक परिस्थिती मध्ये आपण राहतो तिथे राहत असताना जे परिवर्तन होईल ते आपल्यासाठी अनुकूल आहे व ज्या भौगोलिक परिस्थिती मध्ये आपण राहत नाही त्या ठिकाणी झालेले परिवर्तन आपणास प्रतिकूल आहे

६) शारीरिक दुःख कमी करण्यात पोटाचा वाटा सर्वात मोठा आहे ९० % आजार हे पोटातूनच निर्माण होतात

७) आजारांपासून आपला बचाव करणे हे आजारावरती इलाज करण्यापेक्षा सर्वोत्तम आहे

८) भोजन करणं महत्त्वाचं नाही तर खाल्लेले भोजन पचवणे खूप महत्वाच आहे

Comments