Skip to main content

Why sprinkle cow urine in the house? घरात गोमूत्र का शिंपडावे?

 आपल्या हिंदू संस्कृतित गोमुत्राला महत्वाचे स्थान आहे. शुभ कार्यात अशुभ  काही घडू नये म्हणून गोमूत्र शिंपडले जाते. त्यामुळे पुजा, लग्न किंवा अन्य कोणताही समारंभ असो त्यावेळी गोमुत्र शिंपडले जाते. तर तुमच्या कुंडलीतील ग्रहात दोष असल्यास किंवा वास्तू दोष असल्यास तुम्ही दर सोमवारी आणि शुक्रवारी थोडेसे गोमूत्र पूर्ण घरात शिंपडल्याने त्रास कमी होतो, अशी धारणा आहे.


सगळ्या परंपरांच्या मागे मनोवेज्ञानिक किंवा वैज्ञानिक कारणे आहेत आणि त्यांचा संबंध धर्माशीही आहे. घर-परिवारातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ऋषीमुनींनी गोमूत्र  शिंपडण्याचा अचूक उपाय सांगितला आहे. 


जुन्या काळापासून गोमुत्र शिंपडण्याची परंपरा चालत आली आहे. शास्त्रात गाईला पूजनीय आणि पवित्र मानले आहे. गाईला माता असे संबांधले आहे. त्यामुळे गाईपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट पवित्र आहे. हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले गेले आहे. वास्तुनुसार गायीचे गोमूत्र घरातील सग़ळे वास्तुदोष समाप्त करण्यास उपयुक्त ठरते. गायीची पुजा केल्याने आपले पाप नष्ट होते, अशी धारणा आहे.


काही बाबतीत जर तुम्हाला त्रास होत असेल, घरातील सदस्यांमुळे मानसिक ताण आणि क्लेश सहन करावा लागत असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी अनेक परंपरा आहेत. वैदिक काळापासून अशा काही परंपरा आहेत ज्या घराला समृद्ध ठेवतात. त्यापैकी एक म्हणजे घरात गोमूत्र का शिंपडावे? गोमूत्र प्राशन केल्याने मूत्रपिंडाचे आजार व मूत्रविकार बरे करता येतात. अन्नातून युरिया, कीटकनाशके शरीरात जातात. पाणी आणि हवेतूनही दूषित घटक रीरात जातात. त्याचा ताण मूत्रपिंडावर येतो आणि त्यातून मूत्रपिंडाचे विकार वाढतात. गोमूत्र हे त्यावर प्रभावी औषध आहे.


आता गोमुत्राचे फायदे लक्षाते घेतले पाहिजेत. यात घरातील वास्तूदोष मिटण्यासाठी रोज घरात गोमूत्र शिंपडावे. गोमुत्रामुळे वातावरणातील सुक्ष्म किटाणू नष्ट होण्यास मदत होते. तर ज्या घरात गोमुत्र रोज शिंपडले जाते तिथे सगळ्या देव-देवतांचे कृपादृष्टी प्राप्त होते, अशी समजूत  आहे. गोमूत्र  शिंपडल्याने धान्य आणि धनाची कधीच कमतरता जाणवत नाही.

Comments

Popular posts from this blog

hyderabad to hampi | हैद्राबाद ते हंपी

Hyderabad To Hampi :             Hyderabad to Hampi has many distance. You can go from hyderabad to Mahbubnagar. After that when arriving in Mahbubnagar you can take two choices : 1) from Raichur - Sindhanur - Hampi  2) from via Raichur - Ballari - Hampi

Hampi - Hajara Ram Mandir | हंपी हजारा राम मंदीर

Hampi - Hajara Ram Mandir | हंपी हजारा राम मंदीर शाही परिधि के बीचो बीच मौजूद है, हजारा राम मंदिर । इसे देखकर लगता है, मानो बनाने वाले ने अपनी कला की उत्कृष्टता को पत्थरों पर तसल्ली से गढा है । सैकड़ों साल पुरानी बनी मूर्तियों को छूकर लोग एहसास करते हैं कि, यह कोई सपना नहीं है । मंदिर की दीवारों पर बनी नकशी दार मूर्तियों में रामायण की कहानियों को उकेरा गया है ।

Hampi - सासिवे कालु गणपती

सासिवे कालु गणपती             इस ब्रहदाकार की मूर्ति का भव्य गर्भगृह है । यह मूर्ति 18 फीट ऊंची है । इसे एक ही शैली में निर्मित किया गया है । गर्भगृह के सामने रंग मंडप है । यह ऊंचा है और कई खंभों से युक्त है ।            इस देवालय के दाहिनी ओर कुछ पिछले भाग में गणपति का मंडप है । इस गणपति को सासिवे कालू गणपति कहते हैं । इस गणपति को गर्भगृह नहीं है और इसे खुले मंडप में प्रतिष्ठित किया गया है । यह मूर्ति करीब 12 फीट ऊंची है और इसे एक शिला से निर्माण किया गया है ।