देवाची मूर्ती दिसल्याने...
डाेळे काम करत आहेत हे समजत.
आरती करत असताना...
घंटा वाजवली असता, ती कानाने ऐकता आली तर, कान काम करत आहेत हे समजते.
बाेटाने हळद, कुंकू, गंध लावताना... स्पर्शज्ञान ठिक आहे हे समजते....
आरती म्हटल्याने...
स्मरणशक्ती काम करत आहे असेही जाणवते शिवाय आरती ओवाळताना, प्रदक्षिणा घालताना, उजवा आणि डावा मेंदू, ही काम करत आहे, हेही जाणवते.
उदबत्तीचा किंवा धूपाचा वास आल्याने...
नाक काम करत आहे हे समजते.
प्रसाद खाल्ल्याने...
अजून अन्नाची चव
कळते आहे हे समजते.
हे सर्व समजल्यानंतर परमेश्वराकडे काही अजून मागण्यासारखे राहते का ?
Comments
Post a Comment